समुदाय सामग्री मार्गदर्शक
YearCompass चळवळीत योगदान द्यायचे आहे? तुम्ही काय घेऊन याल ते आम्हाला पाहायला आवडेल! ही मार्गदर्शिका तुम्हाला समुदाय सामग्री कशी काम करते आणि तुमची स्वतःची कशी प्रकाशित करावी हे समजण्यात मदत करेल.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
YearCompass समुदाय सामग्री क्षेत्र म्हणजे काय?
हे एक असे स्थान आहे जिथे तुम्ही नियोजन, चिंतन करू शकता आणि इतरांना तसे करण्यात मदत करण्यासाठी तुमच्या स्वतःच्या पद्धती सामायिक करून YearCompass चळवळीत योगदान देऊ शकता. तुम्ही विशिष्ट प्रेक्षकांसाठी विशेष आवृत्ती तयार केली असेल, नवीन दृष्टिकोन जोडले असतील किंवा पूरक व्यायाम विकसित केले असतील, तर या ठिकाणी तुमचे कार्य त्याची गरज असलेल्या लोकांपर्यंत पोहोचू शकते.
माझी सामग्री मूळ पुस्तिकेचा भाग होईल का?
नाही. जर तुमची सामग्री YearCompass संघाच्या तपासणीतून स्वीकारली ली, तर आम्ही ती समुदाय सामग्री विभागात सूचीबद्ध करू आणि तुम्हाला लेखक म्हणून श्रेय देऊ. मूळ पुस्तिकेचा काळजीपूर्वक घडवलेला प्रवाह बदलल्याशिवाय आम्हाला नवीन महान कल्पनांना सामिल करायला आवडेल. एकाच मूळ तत्वाच्या आधारे ही एक चिंतनक्षम साधनांची खाण आहे असे समजा.
तपासणी प्रक्रिया का आहे?
YearCompass चिंतन, वाढ आणि हेतुपूर्ण जीवन या विशिष्ठ मूल्यांसाठी पाठराखण करते. आम्ही अनेक अद्भुत विषयांचा पुरस्कार करतो ज्यांचा या पुस्तिकेत समावेश करता येत नाही, तसेच अनेक अश्या कल्पना देखील असतील ज्या आमच्या तत्वांमधे बसत नाहीत. आमची तपास प्रक्रिया आम्हाला वैविध्यपूरवण हाताळणी आणि सर्वसमावेशक राहूनही पुस्तिकेच्या मूळ साच्याला आणि तत्वांना अबाधित ठेवण्यास मदत करते.
सामग्रीचा मालक कोण?
आमच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेली सर्व सामग्री मूळ पुस्तिकेप्रमाणेच Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International (CC BY-NC-SA 4.0) अंतर्गत परवानाकृत आहे. याचा अर्थ जोपर्यंत तुम्ही मूळ निर्मात्याला योग्य श्रेय द्याल, अव्यावसायिक हेतूंसाठी ती वापराल, आणि कोणत्याही रूपांतरांना त्याच परवान्याखाली सामायिक कराल ती वापरण्यासाठी आणि रीमिक्स करण्यासाठी मोफत आहे. हे धोरण चळवळीला मुक्त आणि सहकारयुक्त ठेवते.
मी माझी स्वतःची सामग्री विकसित करणे कसे सुरू करावे?
आवश्यकता आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी खालील प्रकाशन मार्गदर्शिका वाचा. साधारणपणे एक विषय असतो ज्याबद्दल तुमचा उत्साह असतो आणि ज्यास अधिक खोलवर चिंतनाची गरज असते. उत्तम समुदाय सामग्री तुमच्या स्वतःच्या, किंवा तुमच्या प्रिय गरजा पूर्ण करण्यापासून येते.
मी इंग्रजी आवृत्ती विकसित न करता फक्त माझ्या स्वतःच्या भाषेसाठी सामग्री विकसित करू शकतो का?
होय, पण यामुळे तपासणी प्रक्रिया लांब होईल. YearCompass संघ आंतरराष्ट्रीय आहे, पण आम्ही सर्व भाषा मूळ स्वरूपात बोलत नाही, म्हणून मार्गदर्शनासाठी आम्ही सहसा इंग्रजीत काम करतो. तुम्ही दोन्ही भाषांच्या आवृत्त्या तयार केल्यास चांगले, पण ही कठोर आवश्यकता नाही. तुम्हाला गरज असल्यास समुदायात अनुवादासाठी भरपूर मदत उपलब्ध आहे.
प्रकाशन मार्गदर्शिका
तुमची सामग्री पृष्ठावर अशी दिसेल...
![[object Object]](/static/yearcompass-front-page-e7522e8d81e01f93916356f57969b007.webp)
तुमचे नाव किंवा समुदाय द्वारा
तुमचे नाव किंवा समुदाय द्वारा
तुमच्या सामग्रीचे एक संक्षिप्त वर्णन जे तिची विशिष्टता आणि ती कोणासाठी आहे हे स्पष्ट करते.
...आणि तपासणीसाठी सादर करण्यासाठी तुम्हाला हे आवश्यक असेल:
- ✓ स्रोत फायली (साधेपणा आणि सहकार्यासाठी Google Docs किंवा Sheets शिफारस)
- ✓ PDF फायली (एक पूर्ण पृष्ठ मुद्रणासाठी, एक पुस्तिका मांडणीसाठी - जर दोन्ही अर्थपूर्ण असतील तर)
- ✓ लेखक माहिती (नाव, वेबसाइट किंवा सामाजिक प्रोफाइलचा पर्यायी दुवा)
- ✓ संक्षिप्त वर्णन (कमाल 3 वाक्ये)
- ✓ पूर्वावलोकन प्रतिमा (पोर्ट्रेट प्राधान्य, 1250x1600px शिफारस)
तपशीलवार आवश्यकता यादी
1. स्रोत फायली (डिजिटल आवृत्ती)
आम्ही Google Docs किंवा Sheets वापरण्याची शिफारस करतो कारण तुमची सामग्री तयार करण्यासाठी आणि सामायिक करण्यासाठी ती सर्वात सोपी साधने आहेत. येथे तुम्ही तुमचे चिंतन किंवा नियोजनाची पृष्ठे डिझाइन कराल. एक सामान्य मार्गदर्शक म्हणून, 1, 2 किंवा 4 पृष्ठे उत्तम काम करतात — 1 पृष्ठ स्वतंत्र कृतीसाठी, 2 पृष्ठ दुहेरी-बाजू मुद्रणासाठी, आणि 4 पृष्ठ पुस्तिका स्वरूपासाठी. दोन स्वतंत्र फायली तयार करणे बरेचदा उपयुक्त ठरते: एक पूर्ण-पृष्ठ मुद्रणासाठी अनुकूल आणि दुसरी पुस्तिका आवृत्तीसाठी, कारण लहान पुस्तिका मांडणीला वेगवेगळ्या समायोजनांची गरज असू शकते. हे तुम्हाला एक डिजिटल आवृत्ती देखील देते जी इतर वापरकर्ते ऑनलाइन भरू शकतात किंवा त्यांची स्वतःची वैयक्तिकृत सामग्री तयार करण्यासाठी रीमिक्स करू शकतात.
2. PDF फायली (मुद्रण आवृत्त्या)
तुमची Google Doc किंवा Sheets फाइल PDF फाइल म्हणून निर्यात करा. या फायली A4, A5, Letter, किंवा half-letter आकारात असाव्यात (तुमच्या स्थानावर अवलंबून). ही अशी आवृत्ती आहे जी लोक नियमित कागदावर छापतील.
3. लेखक माहिती
तुमच्याबद्दल लोकांना कळावे असे काहीही सामायिक करा, तुमच्या किंवा तुमच्या समुदायाच्या वेबसाइट, LinkedIn, पोर्टफोलिओ, किंवा इतर कोणत्याही प्रोफाइल पृष्ठाच्या पर्यायी दुव्यासह. आम्हाला तुमच्या योगदानासाठी योग्य श्रेय द्यायचे आहे.
4. संक्षिप्त वर्णन
तुमच्या सामग्रीचे सार विशद करणारे एक अतिशय संक्षिप्त वर्णन लिहा — तीन वाक्यांपेक्षा जास्त नसावे. ते काय विशिष्ट विशद करते आणि ते कोणासाठी आहे ते ठळक करा. हा भाग अत्यंत महत्वाचा आहे, म्हणून वेळ घ्या आणी ते शक्य तितके स्पष्ट आणि प्रेरक होईपर्यंत अनेक वेळा पुन्हा लिहा, कारण लोक तुमची सामग्री वापरतील का हे ठरवण्यासाठी ते या वर्णनावर आधारित पटकन निर्णय घेतील.
5. पूर्वावलोकन प्रतिमा
तुमची सामग्री कशी दिसते ते दाखवणारी एक स्नॅपशॉट प्रतिमा (शिफारस 1250x1600px) तयार करा. हे सामग्री कार्डवरील कार्ड पूर्वावलोकनात दिसते, म्हणून ते स्पष्ट आणि दृश्यात्मकदृष्ट्या आकर्षक बनवा जेणेकरून लोकांना ते काय डाउनलोड करत आहेत हे समजण्यास मदत होईल.
कसे सादर करावे
एकदा तुमची सर्व काही तयार झाले, वरील सूचीबद्ध केलेली सर्व सामग्री hello@yearcompass.com येथे ईमेल करा. आम्ही तुमची सादरीकरणाची तपासणी करू आणि तुमच्याशी परत संपर्क साधू.